Loading ...

झप झप चाललेत - मराठी कविता (दत्ता हलसगीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दत्ता हलसगीकर (गणेश तात्याराव हलसगीकर) यांची झप झप चाललेत ही लोकप्रिय मराठी कविता.

झप झप चाललेत - मराठी कविता (दत्ता हलसगीकर)

मे महिन्याची दुपार रणरणते उन्ह, झगमगता सूर्य आभाळामधून


झप झप चाललेत - मराठी कविता (दत्ता हलसगीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दत्ता हलसगीकर (गणेश तात्याराव हलसगीकर) यांची झप झप चाललेत ही लोकप्रिय मराठी कविता.



मे महिन्याची दुपार रणरणते उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय
झप - झप चाललेत नाजुक पाय

घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप - झप चाललेत नाजुक पाय

माथ्यावर उन्ह पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्‍यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
घड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप - झप चाललेत नाजुक पाय

- दत्ता हलसगीकर (गणेश तात्याराव हलसगीकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची